म्हणून मुख्यमंत्री शिंदे सु्ट्टीवर गेले, अजित पवारांनी कारण सांगताच पिकला हशा
राज्यात महायुतीला बहुमत मिळाले तरी अजून सरकार स्थापन झाले नाही. त्यात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात गावी गेले आहेत. काळजीवाहू सरकारला काम नसतं म्हणून शिंदे गावी गेले आहेत असे कारण अजित पवार यांनी दिले आहे.
पुण्यात बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांना विचारलं की मुख्यमंत्र एकनाथ शिंदे सुट्टीवर का गेले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले की, प्रचारामध्ये सगळे अडकलेले होते, शनिवार रविवार सुट्टी असते, त्यात काळजीवाहू सरकारला काम नसतं, म्हणून एकनाथ शिंदे गावी गेले आहेत. तसेच पाच तारखेला शपथ होईल असा अंदाज आहे असेही पवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List