वाराणसीतील कँट रेल्वे स्थानकाला आग, 200 दुचाकी जळून खाक

वाराणसीतील कँट रेल्वे स्थानकाला आग, 200 दुचाकी जळून खाक

उत्तर प्रादेशिक येथील वाराणसीच्या कँट रेल्वे स्थानकच्या येथे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 200 दुचाकी जळून खाक झाल्याच्या माहिती समोर आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांची वाहने उभी असलेल्या परिसरात ही आग लागली. मात्र अग्निशमन दल आणि जीआरपी-आरपीएफने वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. नाही तर आणखी मोठी दुर्घटना घडू शकली असती, असं बोललं जात आहे.

या आगीत रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या सुमारे 200 दुचाकी जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना वाराणसीच्या कँट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर असलेल्या जीआरपीच्या मागे असलेल्या रेल्वेच्या दुचाकी स्टँडवर घडली आहे. जिथे रेल्वे कर्मचारी त्यांची वाहने पार्क करतात, असं सांगितलं जात आहे.

या घटनेची माहिती देताना स्थानिकांनी सांगितलं की, येथे रात्री साडेदहाच्या सुमारास एकदा शॉर्टसर्किट झालं होतं. यानंतर वीज कर्मचारी हे दुरुस्त करण्यासाठी आले होते. मात्र काही तासांनंतर पुन्हा शॉर्ट सर्किट झालं. याचीच ठिणगी पेट्रोलने भरलेल्या दुचाकींपर्यंत पोहोचली आणि आग लागली, असं स्थानिकांनी सांगितलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;