नागा चैतन्यला सासरच्या मंडळींकडून करोडोंच्या भेटवस्तू! नागार्जुन यांनी ‘ही’ भेट दिली

नागा चैतन्यला सासरच्या मंडळींकडून करोडोंच्या भेटवस्तू!  नागार्जुन यांनी ‘ही’ भेट दिली

Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding: दाक्षिनात्य अभिनेता नागा चैतन्य सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. नागा चैतन्य लवकरच अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्यासोबत लग्नबंधनात अडकरणार आहे. सध्या नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दोघांच्या हळदीचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असताना आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. नागा चैतन्य याला सासरच्या मंडळींकडून महागड्या भेटवस्तू देखील मिळाल्या आहेत. लग्नाची भेट म्हणून सासरच्या मंडळींनी अभिनेत्याला महागड्या वस्तू दिल्या आहेत. तर अभिनेत्याचे वडील नागार्जुन यांनी देखील होणाऱ्या सूनेला खास भेटवस्तू दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागा चैतन्य याला लग्नाची भेट म्हणून सासरच्या मंडळींकडून आलिशान घर, महागडी कार, सोनं आणि बरंच काही मिळालं आहे. शोभिता धुलीपालाच्या कुटुंबाने होणाऱ्या जावयाला एक बाईक, एक ऑडी कार आणि हैदराबादमध्ये एक आलिशान व्हिला सोबत सोने भेट दिले आहे. नागार्जुनने दाम्पत्याला एक आलिशान कार भेट दिली आहे.

नागार्जुनने जोडप्याला करोडोंची कार दिली भेट

नागार्जुन यांनी मुलगा नागा चैतन्य आणि होणारी सून शोभिता धुलिपाला यांना लेक्सस एलएम एमपीव्ही मॉडेलची कार भेट म्हणून दिली आहे. या आलिशान कार किंमत तब्बल 2.5 कोटी रुपये आहे. नुकताच, नागार्जुनला खैरताबाद येथील प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीए) कार्यालयात स्पॉट करण्यात आलं, जेथे अभिनेता नवीन खरेदी केलेल्या लक्झरी कारची नोंदणी करण्यासाठी आला होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sobhita (@sobhitad)

 

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला 5 डिसेंबर रोजी लग्न करणार असल्याचा दावा केला जात आहे. तेलुगु रितीरिवाजानुसार दोघांतं लग्न पडणार आहे. सध्या त्यांच्या हळदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये शोभिता प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शोभिता धुलिपाला – नागा चैतन्य यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;