ए. आर. रेहमान यांच्या पत्नीला मिळणार भरभक्कम पोटगी? काय म्हणाली वकील?

ए. आर. रेहमान यांच्या पत्नीला मिळणार भरभक्कम पोटगी? काय म्हणाली वकील?

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर पत्नी सायरा बानूसोबत घटस्फोट घेत असल्याचं जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. सायरा यांनीसुद्धा वकील वंदना शाहच्या माध्यमातून सोशल मीडियावर पोस्ट लिहित विभक्त होणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर घटस्फोटाप्रकरणी पुढे काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. आता वकील वंदना शाहने रेहमान आणि सायरा यांच्यात पुन्हा सलोखा होऊ शकतो का आणि त्यांच्या तीन मुलांचा ताबा कोणाला मिळू शकतो, याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

विकी ललवानीच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत वंदना शाह यांना रेहमान आणि सायरा यांच्या मुलांच्या कस्टडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “त्याबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्याविषयी निर्णय घेणं बाकी आहे. पण काही मुलं प्रौढ असल्याने त्यांना कोणासोबत राहायचंय याचा निर्णय घेण्यासाठी ते मुक्त आहेत.” यावेळी वंदना यांना पोटगीबद्दलही सवाल करण्यात आला होता. रेहमान यांच्याकडून सायरा यांना मोठी पोटगी मिळेल का, असं त्यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर वकिलांनी उत्तर देणं टाळलं. त्याचप्रमाणे सायरा या पैशांचा विचार करणाऱ्या नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

या मुलाखतीत सायरा यांनी रेहमान आणि सायरा यांच्यात पुन्हा सलोखा होण्याची शक्यताही नाकारली नाही. “मी असं म्हटलं नाही की या दोघांमध्ये सलोखा होऊ शकत नाही. मी याबाबत खूप सकारात्मक आहे आणि मी नेहमीच प्रेम, रोमान्स याबद्दल बोलत असते. दोघांनी एकत्र दिलेलं स्टेटमेंट खूपच स्पष्ट आहे. त्यात विभक्त होण्याबद्दलचं दु:ख व्यक्त केलं गेलंय. रेहमान आणि सायरा हे अनेक वर्षं या नात्यात होते आणि या निर्णयापर्यंत पोहोचण्याआधी त्यांनी बराच विचार केला. पण मी असं कुठेच म्हटलं नाही की हे दोघं पुन्हा एकत्र येऊ शकत नाहीत.”

रेहमान आणि सायरा यांनी 1995 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना खतिजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुलं आहेत. घटस्फोटाच्या निर्णयानंतर रेहमान यांच्यावर बरीच टीका झाली. या टीकेनंतर सायरा यांनी त्यांची बाजू घेत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. “ए. आर. रेहमान हे व्यक्ती म्हणून हिऱ्यासारखे आहेत. या जगातील ते सर्वोत्कृष्ट पुरुष आहेत. माझ्या आरोग्याच्या समस्यांमुळे मला चेन्नई सोडावं लागलं. चेन्नईत कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्याला हे शक्य झालं नसतं. मी युट्यूबर्स आणि तमिळ मीडियाला विनंती करते की त्यांनी त्यांच्याविरोधात काहीही वाईट बोलू नये. माझ्या आयुष्यात मी त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला. इतकं माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यावर चुकीचे आरोप करू नका”, असं सायरा यांनी म्हटलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;