TV च्या राम-सीतेनं कुटुंबीयांच्या नकळत गुपचूप उरकलं होतं लग्न; त्यावेळी गुरमीतचं वय फक्त..
'रामायण' या मालिकेत राम-सीतेची भूमिका साकारलेले गुरमीत चौधरी आणि डेबिना बॅनर्जी यांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. मात्र सर्वांसमोर झालेल्या या लग्नाआधीच गुरमीत आणि डेबिनाने गुपचूप त्यांचं लग्न उरकलं होतं.
2003 मध्ये जेव्हा गुरमीत 19 वर्षांचा होता, तेव्हाच त्याने डेबिनाशी लग्न केलं होतं. या लग्नाबद्दल दोघांच्या कुटुंबीयांनाही माहित नव्हतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गुरमीतने या लग्नाचा खुलासा केला.
मी 19 वर्षांचा होतो, तेव्हाच डेबिनाशी लग्न केलं होतं. त्यावेळी ती एका साऊथ सुपरस्टारसोबत काम करत होती आणि मी इंडस्ट्रीत स्ट्रगल करत होतो. माझ्याकडे बाइकमध्ये पेट्रोल टाकण्यासाठीही पैसे नसायचे", असं गुरमीत म्हणाला.
डेबिना त्यावेळी मोठमोठ्या स्टार्ससोबत शूटिंग करत होती. त्यावेळी माझ्या मनात विचार आला की ती शूटिंग करत राहील आणि मी इथे बाइकवरच फिरत बसेन. याविषयी एकेदिवशी मी तिच्याशी बोलत होतो, तेव्हा तिने लगेच लग्नाबद्दल विचारलं", असं त्याने पुढे सांगितलं.
डेबिनाने लग्नाबद्दल विचारताच गुरमीतनेही तडकाफडकी होकार दिला. "मी तिला म्हटलं की लग्नाची सर्व तयारी मी करतो. तू फक्त तिथे ये. मी सर्व तयारी केली होती. तिला वाटलं की लग्नाबद्दल आम्ही फक्त मस्करीत बोलत होतो. पण मी गंभीर होतो", असं गुरमीतने सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.






Comment List