आम्ही आमच्या कामाला लागलोय! आदित्य ठाकरे मैदानात उतरले
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 9 दिवस उलटले तरी अद्याप महाराष्ट्रात नवीन सरकार बसलेले नाही. एकीकडे सत्तास्थापनेवरून महायुतीत साठमारी सुरू असताना दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी वरळी विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत शिवसेना शाखांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. वरळीतील जरी माता मंदिरात जाऊन आदित्य ठाकरे यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.
जनतेचे आणि जरी मातेचे दर्शन घेऊन आम्ही परत मैदानात उतरलो आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत असून याबाबत विचारले असता ते म्हणाले की, ही नावे आपल्याच माध्यमातून कळत आहेत. मात्र त्यावर बोलून उपयोग नाही. आम्ही आमच्या कामाला लागलो असून पुन्हा एकदा जनतेत येऊन जनतेची सेवा करत आहोत.
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी वरळी विधानसभा दौरा प्रसंगी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद साधला.@AUThackeray pic.twitter.com/dBzmpb0Bnl
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 29, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List