नवऱ्याचे वाईट कृत्य, मुलाच्या गर्लफ्रेंडने संपवलं आयुष्य… अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीकडून मोठा खुलासा…

नवऱ्याचे वाईट कृत्य, मुलाच्या गर्लफ्रेंडने संपवलं आयुष्य… अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीकडून मोठा खुलासा…

बॉलिवूडमधील अभिनेत्रींना खासगी आयुष्यात अनेक चांगल्या – वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. अभिनेत्री झरीना बहाव हिने देखील खासगी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारत झरीना हिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. पण खासगी आयुष्यात अभिनेत्रीने वाईट गोष्टींचा सामना केला आहे. झरीना बहावने नुकताच पती आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये झरीना बावाहने सांगितलं की, तिला पती आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल माहिती होतं. पण माहिती असताना देखील अभिनेत्री मौन बाळगून होती.

आदित्य पंचोली याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल सांगायचं झालं तर, 1993 मध्ये आदित्य याचं नाव अभिनेत्री पूजा बेदी हिच्यासोबत देखील जोडण्यात आलं होतं. रिपोर्टनुसार, पूजाच्या घरातील हाउस हेल्प मुलीसोबत आदित्य पंचोलीने सिनेमांमध्ये काम देण्याचं आमिष देत वाईट कृत्य केलं. तेव्हा पूजा आणि आदित्य रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा देखील रंगल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

कंगना रणौत यांनी केले गंभीर आरोप…

पूजा बेदी हिच्यानंतर आदित्य पंचोली याच्या नावाची चर्चा अभिनेत्री कंगना रणौत यांच्यासोबत होऊ लागली. कंगना तेव्हा फक्त 17 वर्षांच्या होत्या. आदित्य पांचोलीने कंगनाला देखील हिरोईन बनवण्याचे आश्वासन देऊन त्यांचं शारीरिक शोषण केलं. तब्बल 4 वर्षांनंतर कंगनाने आदित्य विरोधात पोलिसांत केस दाखल केली. ज्यामध्ये कंगनाने मारहाणीचे आरोपही केले होते.

काय म्हणाली आदित्य पंचोलीची बायको झरीना बहाव?

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत झरीना बहाव यांनी नवरा आणि मुलाच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. शिवाय आदित्य पंचोली याच्या गर्लफ्रेंडबद्दल देखील झरीना हिला माहिती होतं. झरीना बहाव म्हणाली, ‘नवऱ्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल मला सर्वकाही माहिती होतं.’
‘पण मी कधीच त्याला काहीही बोलली नाही. कारण मी आदित्यवर प्रचंड प्रेम करते. तो माझ्याशी कसा वागतो याची मला फक्त काळजी होती. त्याने कधीच माझ्याकडे दुर्लक्ष केलं नाही. त्याने मला कधी कामासाठी नकार दिला नाही. माला वाईट वागणूक दिली नाही..’ असं झरीना नवऱ्यात्या नवऱ्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल म्हणाली.

शिवाय मुलगा सुरज पंचोली याच्या खासगी आयुष्याबद्दल देखील झरीना हिने मोठं वक्तव्य केलं. सुरज याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री जिया खान हिने स्वतःला संपवलं आणि सुरज पंचोलीवर गंभीर आरोप केला. ज्यामुळे सुरज कायद्याच्या कचाट्यात अडकला होता. जियाच्या मृत्यूबद्दल झरीना म्हणाली, ‘जियाने मृत्यूपूर्वी देखील 4 – 5 वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त झरीना बहाव हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;