ठिणगी पडली, वणवा नक्की पेटेल! उद्धव ठाकरे पुण्यात बाबा आढाव यांची घेणार भेट
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैशांचा पूर आणि पैसे वाटले गेले, याविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुण्यात बाबा आढाव यांची भेट घेणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बाबा आढाव यांच्या भेटीसाठी पुण्यात निघाले आहेत. ठिणगी पडली वणवा नक्की पेटेल!!
बाबा आढाव यांनी पुण्यातील फुले वाड्यात गुरुवारपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बाबा आढाव यांची भेट घेतली. या वेळी शरद पवार आणि बाबा आढाव यांच्यात चर्चाही झाली. आज दुपारी उद्धव ठाकरे हे बाबा आढाव यांची भेट घेतील आणि त्यांच्यांशी संवाद साधतील.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे
बाबा आढाव यांच्या भेटीसाठी पुण्यात निघाले आहेत.
ठिणगी पडली
वणवा नक्की पेटेल!! pic.twitter.com/TKKRhIZTMX— Sanjay Raut (@rautsanjay61) November 30, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List