हरयाणात 14 लाख, महाराष्ट्रात 76 लाख; वाढलेली मतंच महायुतीच्या विजयाचा शिल्पकार, संजय राऊत यांचा घणाघात

हरयाणात 14 लाख, महाराष्ट्रात 76 लाख; वाढलेली मतंच महायुतीच्या विजयाचा शिल्पकार, संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालासंदर्भात देशभरातच नव्हे तर जगभरातील अनेक भागांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. 76 लाख मते कशी वाढली? हा प्रश्न अनुत्तरित आहे. ‘सामना’ चित्रपटात एक डायलॉग आहे. मारुती कांबळेचे काय झाले? तसेच 76 लाख मतांचे काय झाले? 5 वाजल्यापासून रात्री साडे अकरा वाजेपर्यंत ही मते कुठून आली? हरयाणात 14 लाख मते वाढली होती, तसाच हा फॉर्म्युला असून महाराष्ट्रातील 76 लाख मतांचा हिशेब लागत नाही. ही वाढलेली मते महायुतीच्या विजयाचा शिल्पकार आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, 76 लाख मते कुठून आली हा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला असून आमचाही तोच प्रश्न आहे. रात्री साडे अकरा वाजेपर्यंत रांगा लावून मतदान कुठे सुरू होते हे निवडणूक आयोगाने दाखवावे. रात्री साडे अकरा वाजता कोण मतदान करत होते? हरयाणात 14 लाख मते वाढली आणि भाजपचा विजय झाला. महाराष्ट्रातही 76 लाखे मते वाढली आणि महायुतीचा विजय झाला. मात्र हा विजय खरा नाही.

डॉ. बाबा आढाव आणि त्यांच्यासह असंख्य लोक आंदोलनामध्ये उतरले असून हळूहळू महाराष्ट्र त्यात सहभागी होईल. राज्यातील लोकशाही, समाजव्यवस्था धोक्यात आहे. निवडणूक यंत्रणा भ्रष्ट झालेली आहे. 95 वर्षाचे बाबा आढाव हे पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. आज शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली आणि इतरही नेते जातील. पण हे चित्र अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राला कलंक लावणारे आहे, असे संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे निकाल लागून 8 दिवसांपेक्षा जास्त काळ झालेला आहे. या निकालाविषयी लोकांच्या मनात संशय आहे. लोक खुश नाहीत. एवढा मोठा विजय प्राप्त झालेला असतानाही कुठेही आनंदाचे वातावरण दिसत नाही. स्वत: काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर त्यांच्या गावाला गेले आहेत. कोण मुख्यमंत्री होणार याची महाराष्ट्र वाट पाहतोय. फडणवीस होतात की आणखी कुणाचे नाव येते, माहिती नाही.

दरम्यान, अनेक उमेदवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत फेरमतमोजणीसाठी पैसे भरले आहेत. यातून काही साध्य होईल का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग, न्यायालयाकडून कोणतीही अपेक्षा नाही. सर्वोच्च न्यायालय काहीही ऐकायला तयार नाही. न्यायालयाने जनतेचे म्हणणे ऐकले नाही तर आम्ही ते कशासाठी स्थापन केले? ईव्हीएम संदर्भातील याचिका 2 मिनिटात उडवून लावता. हा कोणता न्याय झाला? असा सवाल राऊत यांनी केला.

लोक रस्त्यावर उतरलेले असून एरवी तुम्हाला जनआक्रोश दिसतो आणि सुमोटो कारवाई करता. पण या प्रकरणामध्ये म्हणतात की, जेव्हा तुमचा विजय होता तेव्हा येत नाही, पराभव होतो तेव्हा आमच्याकडे ईव्हीएमची तक्रार घेऊन येता. पण असे कधीही झालेले नाही. गेल्या 10 वर्षापासून निकाल सकारात्मक असो किंवा नकारात्मक आम्ही सातत्याने मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला पाहिजे असे म्हणतोय. जगामध्ये कुठेही ईव्हीएमचा वापर होत नाही. मग भारतातच अट्टाहास कशाला? मोदी-शहांची एवढी ताकद असेल, जिंकण्याची खात्री असेल त्यांनी मतपत्रिकेवर जिंकून दाखवावे, असे आव्हानही राऊत यांनी दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;