अँजेला, मला माफ कर … पुतीन यांनी मागितली माफी
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी जर्मनीच्या माजी चान्सलर अँजेला मर्केल यांची आज माफी मागितली. ‘अँजेला मर्केल या श्वानांना घाबरतात हे मला माहीत नव्हते. माहीत असते तर मी श्वानाला सोडले नसते,’ असे स्पष्टीकरण पुतीन यांनी दिले. अँजेला मर्केल यांचे ‘फ्रीडम’ पुस्तक 26 नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाले. यामध्ये मर्केल यांनी आपल्या 16 वर्षांच्या कार्यकाळातील राजकीय आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित घटनांबद्दल लिहिलंय. यामध्ये त्यांनी पुतीन यांनी श्वानाच्या मदतीने घाबरवल्याचा किस्सा लिहिला आहे. वास्तविक ही घटना 2007 ची आहे. अँजेला मर्केल आणि पुतिन यांच्या भेटीदरम्यान पुतिन यांचा पाळीव लॅब्राडोर श्वान ‘कोनी’ तेथे आला होता. यामुळे मर्केल खूप घाबरल्या होत्या.
17 वर्षांनंतर घटना चर्चेत
मर्केल यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने 17 वर्षांनंतर ही घटना पुन्हा चर्चेत आली. अँजेला मर्केल यांनी पुस्तकात लिहिलंय की, पुतिन आणि मी रशियातील सोची येथे भेटलो. मी त्यांच्याशी बोलत असताना खोलीत एक मोठा श्वान आला. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण तो माझ्या खूप जवळ आला. यामुळे मी अस्वस्थ झाले. समोर कॅमेरे होते आणि फोटोग्राफर फोटो काढत होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List