गर्भधारणा आई आणि बाळ दोघांसाठीही घातक म्हणून…, प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

गर्भधारणा आई आणि बाळ दोघांसाठीही घातक म्हणून…, प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

Actress on pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री कायम त्यांच्या फिटनेसबाबत जागृत असतात. नियमित जीम, योगा, योग्य आहार… अशा अनेक गोष्टींचं पालन करुन अभिनेत्री स्वतःला फिट ठेवतात. अशात प्रग्नेंसीनंतर अभिनेत्रींना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत एका अभिनेत्री प्रेग्नेंसीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्ची रंगली आहे.

प्रेग्नेंसीबद्दल वक्तव्य करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री शर्लिन चोप्रा आहे. शर्लिन बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील शर्लिन कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर शर्लिनच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sherlyn Chopra (@_sherlynchopra_)

 

नुकताच झालेल्या मुलाखतीत शर्लिन म्हणाली, ‘मी कधीच प्रेग्नेंट राहू शकत नाही. कारण प्रेग्नेंसी आई आणि बाळासाठी घातक असू शकते… काही समस्या आहेत, ज्यामुळे मी प्रेग्नेंट राहू शकत नाही… अशात माझ्याकडे कोणते – कोणते पर्याय आहेत… जे आपल्या देशात मान्य आहेत… मला आई व्हायचं आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मल कमीत कमी 3 – 4 मुलं देखील हवी आहेत. मी तर माझ्या मुलांचे नाव देखील ठरवले आहेत. माझ्या मुलांची नावे अ अक्षरापासून असावीत असं मला वाटतं…. यामागे देखील एक कारण आहे आणि ते कारण मी योग्य वेळ आल्यानंतर सांगेल… जेव्हा जेव्हा मुलांचा विचार करत तेव्हा मला प्रचंड आनंद होतो…’ असं देखील शर्लिन म्हणाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sherlyn Chopra (@_sherlynchopra_)

 

शर्लिन चोप्रा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण अनेक पोस्टमुळे अभिनेत्रीवर नेटकऱ्यांकडून निशाणा साधला जातो.. आता अभिनेत्री तिच्या ओठांमुळे चर्चेत आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;