महायुतीचं ठरतंय तोपर्यंत ‘देवमाणसा’ने जाहीर केलं ‘होम मिनिस्टर’पद
झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड याने त्याच्या रिलेशनशिपचा खुलासा करून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. किरणने त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.
अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्याने जाहीर केलंय. या दोघांनी रोमँटिक फोटोशूट केलंय. त्याचेच फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांनी प्रेम व्यक्त केलंय.
'तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस, पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे. मंत्रिमंडळल्या बैठका होत राहतील, मंत्रिपदं वाटत राहतील, त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो.. ही आहे माझी होणारी 'होम मिनिस्टर'', अशी पोस्ट किरणने लिहिली.
तर वैष्णवीनेही 'तू आणि तूच' असं कॅप्शन देत किरणसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. वैष्णवीने 'तू चाल पुढं', 'देवमाणूस 2' या मालिकांमध्ये काम केलंय. ती सध्या 'तिकळी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List