ट्रिटमेंटनंतर इतका बिघडला शर्लिन चोप्राचा चेहरा? अवस्था पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का!

ट्रिटमेंटनंतर इतका बिघडला शर्लिन चोप्राचा चेहरा? अवस्था पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का!

अभिनेत्री शर्लिन चोप्रा मोठ्या पडद्यापासून जरी दूर असली तरी सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते. पापाराझी अकाऊंटवर तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर केले जातात. शर्लिन तिच्या बोल्ड कपड्यांमुळे अधिक चर्चेत असते. सार्वजनिक ठिकाणी अत्यंत तोकडे कपडे घालून फिरल्याने अनेकदा तिला ट्रोलही केलं गेलंय. हल्ली सेलिब्रिटी सुंदर दिसण्यासाठी बोटॉक्स, फिलर्स, सर्जरी या पर्यायांचा सर्रास प्रयोग करताना दिसतात. शर्लिननेही तिच्या चेहऱ्यावर फिलर्स करण्याचं ठरवलं. मात्र यानंतर तिचा चेहरा अधिकच खराब झाल्याचं पहायला मिळतंय. तिच्या बिघडलेल्या चेहऱ्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

याविषयी शर्लिन म्हणाली, “मी एका डॉक्टरांशी कन्सल्ट केलं होतं. त्यांनी माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर फिलर्स केले. इंजेक्शन्स दिले. माझ्या जॉ-लाइनवर त्यांनी असे फिलर्स केले आहेत, ज्यामुळे 110 अंशांचा अँगल दिसतोय. माझे गाल खूप फुगलेले दिसत आहेत. संपूर्ण चेहरा सुजलेला दिसतोय. ओठसुद्धा खूप विचित्र दिसतायत. या ट्रिटमेंटनंतर मी खूपच वेगळी दिसतेय. माझा चेहरा जणू एलियनसारखा दिसतोय. माझे मित्रमैत्रिणी मला म्हणत होते की तू तुझ्या चेहऱ्याचं काय केलंस? यानंतर मी पुन्हा डॉक्टरांकडे गेले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sherlyn Chopra (@_sherlynchopra_)

“मी डॉक्टरांवर खूप भडकले. तेव्हा ते म्हणाले की, हे फिलर्स आहेत, काळजी करू नकोस. आपण त्याला डिजॉल्व करू शकतो. ते पर्मनंट नसतात. या अनुभवानंतर मी सर्वांना हेच सांगू इच्छिते की मेकओव्हरसाठी तुम्ही असे काही पर्याय अवलंबू नका. हे योग्य नाही. तुम्ही जसे आहात तसेच राहा”, असा सल्ला शर्लिनने नेटकऱ्यांना दिला.

सौंदर्याची संकल्पना आणि त्याची मापदंडं ही बदलत्या काळानुसार बदलत आहेत. सध्या अनेक लोकांचा कल हा नैसर्गिक सौंदर्यापेक्षा ‘फेक ब्युटी’कडे वाढत चालला आहे. कलाविश्वातील अनेकांना आपण प्लास्टिक सर्जरी, बोटॉक्स, लिप फिलर्स यांसारख्या गोष्टींच्या आहारी जाताना पाहिलंय. मात्र या गोष्टी प्रत्येकालाच चांगल्या दिसतील, याची खात्री नसते. याआधी इतरही काही अभिनेत्रींचा चेहरा फिलर्सनंतर बिघडलेला पहायला मिळाला. आपल्या चित्रविचित्र फॅशनसाठी ओळखली जाणारी उर्फी जावेदसुद्धा यामुळे चर्चेत आली होती. वयाच्या अठराव्या वर्षापासून चेहऱ्यावर फिलर्स आणि बोटॉक्स करत असल्याची कबुली उर्फीने एका मुलाखतीत दिली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;