74 लाखांचा मटका जिंकला आहे, तुम्हाला अटक करू! सायबर चोरांचा डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिकाला गंडा

74 लाखांचा मटका जिंकला आहे, तुम्हाला अटक करू! सायबर चोरांचा डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिकाला गंडा

तुमच्या मोबाईलवरून मटका खेळत तुम्ही दोन कोटी कमावले आहेत. यासंदर्भात आमच्याकडे चौकशी आली आहे. न्यायालयाने तुम्हाला अटक करण्याचा हुकूम दिला आहे, असे सांगत एका तोतया पोलिसाने डोंबिवलीतील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला 74 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस झाली आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे आणि मानपाडा पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात एका परदेशी कंपनीतून वरिष्ठ पदावरून निवृत्ती दिवसांपूर्वी त्यांना मोबाईलवरून एका अज्ञात इसमाने संपर्क केला. मी मुंबईतील एका पोलीस ठाण्यातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोलतो आहे. तुम्ही नवीन मोबाईल सीम कार्ड घेतले आहे. या कार्डसाठी वापरलेल्या आधार कार्डाच्या माध्यमातून तुमच्या एका हस्तकाने गैरव्यवहार केले आहेत. तुम्ही मटक्याच्या माध्यमातून दोन कोटी कमावले आहेत, अशी दमबाजी या अज्ञात इसमाने केली. या चौकशीला घाबरून सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाने 74 लाखांची रक्कम तोतया पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या बँक खात्यावर वळती केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;