डॉ. बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा, आज प्रत्येक जिल्ह्यात लाक्षणिक उपोषण

डॉ. बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा, आज प्रत्येक जिल्ह्यात लाक्षणिक उपोषण

विधानसभा निवडणुकीत पैशांचा पूर आला. पैसे वाटपाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. त्यावर तीव्र संताप व्यक्त करत लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी 95 वर्षीय योद्धा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी महात्मा फुले वाडा येथे गुरुवारपासून आत्मक्लेश उपोषण आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. राज्यात सर्वच जिह्यांत उद्या या उपोषणाच्या समर्थनार्थ लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्य संस्थेद्वारेच लोकशाहीला नख लागत असून संविधानिक मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. विधानसभा निवडणुकांत झालेला पैशाचा वापर आणि भ्रष्टाचारी अदानींना केंद्र सरकार देत असलेल्या पाठिंब्यामुळे तर याचा कळस गाठला गेला आहे. लोकशाही रक्षणाची व संविधानानुरूप देश घडवण्याची जबाबदारी नागरिकांचीही आहे. त्यामुळे डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन सुरू केले आहे.

महात्मा फुले वाडय़ात उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची आज रीघ लागली होती. यात ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी, आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, किरण मोघे, मेधा थत्ते, शेकापाचे  नेते भाई संपतराव पवार, धनाजी गुरव, अॅड. एल. टी. सावंत, जलतज्ञ डॉ प्रदीप व विद्या पुरंदरे, मानव कांबळे, अश्विनी कदम, साम्यवादी नेते अॅड. नाथा शिंगाडे यांसह शेकडो नागरिकांचा यामध्ये समावेश होता.

सरकारच्या भूमिकेविरुद्ध नागरिकांनी उभे राहिले पाहिजे

डॉ. बाबा आढाव म्हणाले, निवडणूक प्रकियेमधील नागरिकांच्या आणि विरोधकांच्या शंकाचे निरसन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. ती जबाबदारी सरकार जर टाळत असेल तर सरळच सरकारला विरोधकांशिवाय एकाधिकार देणारी लोकशाही हवी आहे असेच म्हणावे लागेल. अशावेळी नागरिकांनी जबाबदार व्हावे आणि  सरकारच्या भूमिकेविरुद्ध उभे ठाकावे.

डॉ. बाबा आढाव व त्यांचे सहकारी नितीन पवार, गोरख मेंगडे यांनी गुरुवारपासून सुरू केलेल्या तीन दिवसीय आत्मक्लेश उपोषण आंदोलनाला पहिल्या दिवसापासून राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.  सातारा येथे तीन दिवसांचे आत्मक्लेश उपोषण कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे. नगर, परभणी, श्रीगोंदा, छत्रपती संभाजीनगर येथे पाठिंबादर्शक उपोषण करण्यात आले. उद्या ‘भारत जोडो’ अभियानाच्या वतीने राज्यातल्या जवळपास सर्व जिह्यांत आत्मक्लेश लाक्षणिक उपोषण केले जाईल. ठाणे येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या वंदना शिंदे यांच्यासह आणखी दोन कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी येऊन पाठिंबा देत लाक्षणिक उपोषण केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;