कारवाईच्या नावाखाली महिलेला कपडे काढायला लावले, सोशल मीडियावरदेखील व्हायरल केला व्हिडीओ 

कारवाईच्या नावाखाली महिलेला कपडे काढायला लावले, सोशल मीडियावरदेखील व्हायरल केला व्हिडीओ 

सीबीआय दिल्लीचे अधिकारी असल्याचे भासवत कारवाईची भीती दाखवून महिलेला हॉटेलमधील रूम बुक करायला लावली. बॉडी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली ठगाने महिलेला कपडे काढायला लावल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

सायबर ठग हे फसवणुकीसाठी वृद्ध, गृहिणी यांना टार्गेट करत असतात. ठगाने पोलीस असल्याची बतावणी करून महिलेला कपडे काढायला लावल्याची संतापजनक घटना मुंबईत घडली आहे. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पीडित महिला उत्तर मुंबईत राहते. त्या अंधेरी येथे एका पंपनीत काम करतात. त्या कार्यालयात काम करत असताना त्याना तीन नंबर वरून पह्न आला. पह्न करणाऱयाने दिल्ली सीबीआयचा अधिकारी असल्याचे भासवले. दिल्ली सीबीआयचा अधिकारी असल्याने महिला या घाबरल्या. ठगाने महिलेला व्हिडीओ कॉल केला. एका प्रकरणात तुमचा सहभाग असल्याचे भासवले.

या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागणार आहे. त्यामुळे गोपनीयता बाळगावी लागेल. यासाठी ठगाने महिलेला एक हॉटेलमध्ये रूम बुक करायला लावला. भीतीपोटी महिलेने रूमदेखील बुक केला. हॉटेलवर गेल्यावर ठगाने तिला पुन्हा व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओ कॉलवरून नरेश नावाच्या व्यक्तीची माहिती सांगितली. मनी लॉण्डरिंगच्या गुह्यात सहभाग आढळून आला आहे. ठगाने महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्या बँक खात्याची माहिती काढली. त्यानंतर ठगाने तिच्या खात्यातून 1 लाख 78 हजार रुपये वळते केले. एवढय़ावर न थांबता ठगाने तिला कारवाईची भीती दाखवून बॉडी व्हेरिफिकेशन करायचे असल्याचे सांगितले. काही वेळाने ठगाने तिला व्हिडीओ कॉल केला. बॉडी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली ठगाने तिला कपडे काढायला लावले. ठगाने महिलेचा तो व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील व्हायरल केला. त्या व्हिडीओची माहिती समजताच महिलेला धक्का बसला. याआधी सप्टेंबर महिन्यात एका तरुणीलाही गुन्हे शाखेचे अधिकारी भासवून बॉडी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली कपडे उतरवायला भाग पाडले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;