भांडुपमधील शाळेत विद्यार्थिनींचा विनयभंग, उद्वाहनाच्या दुरुस्ती करणाऱ्या तरुणाचे कृत्य

भांडुपमधील शाळेत विद्यार्थिनींचा विनयभंग, उद्वाहनाच्या दुरुस्ती करणाऱ्या तरुणाचे कृत्य

शाळांमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनी सुरक्षित आहेत की नाही असा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. बदलापूरची संतापजनक घटना ताजी असताना मुली, महिलांसोबत कुठे ना कुठे अशा वाईट घटना घडतच आहे. भांडुपमधील एका शाळेत तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा एका तरुणाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आल्याने पालक व नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

भांडुप पश्चिमेकडील एका शाळेत बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उद्वाहनाच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी आरोपी तरुण आला होता. दरम्यान, 10 वर्षांच्या दोन व एक 12 वर्षीय विद्यार्थिनी शाळेच्या तळघरात योगाचा क्लास आटोपून वरच्या मजल्यावर जिना चढून जात असताना आधीच तेथे बराच वेळापासून उभ्या असलेल्या त्या तरुणाने कोणी नसल्याची संधी साधत एका मुलीला स्पर्श केला तर अन्य दोघींकडे अश्लील भावनेने बघत नको ते भाष्य केले. हा प्रकार मुलीने घरी गेल्यावर पालकांना सांगितल्यावर पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. भांडुप पोलिसांनी तत्काळ विनयभंग व ‘पोक्सो’ अन्वये गुन्हा दाखल करून गोपाल गौडा (27) या तरुणाला अटक केली. गोपाल हा मूळचा ओडिशाचा असून सध्या तो दिवा येथे राहतो. या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;