ऑस्ट्रेलियाने विराटच्या फलंदाजीला सूर दिला – बॉर्डर
हिंदुस्थानचा स्फोटक फलंदाज विराट कोहली गेल्या दीड वर्षापासून कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकवण्यासाठी धडपडत होता, मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात विराटने शतक ठोकत आपला फॉर्म आणि आत्मविश्वास पुन्हा प्राप्त केला आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी विराटला हरवलेला फलंदाजीचा फॉर्म परत मिळवून दिल्याने पुढील चार कसोटींत त्याचा फटका ऑस्ट्रेलियाला बसू शकतो, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर यांनी संघाच्या गोलंदाजांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचे वाभाडे काढले. पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिकेची दणक्यात सुरुवात केली. गेल्या दीड वर्षापासून विराट कसोटीमधील फॉर्म परत मिळवण्यासाठी चाचपडत होता, मात्र पहिल्या कसोटीतील दुसऱया डावात विराटने नाबाद 100 धावांची खेळी करून कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List