राज कुंद्राच्या घरी ईडीची धाड
पोर्नेग्राफी नेटवर्क संदर्भात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने आज बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या मुंबईतील राहत्या घरी धाड टाकली. कुंद्राच्या मुंबईतील कार्यालयांचीही झाडाझडती घेण्यात आली. कुंद्रा आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींच्या मुंबईतील जवळपास 15 ठिकाणांवर आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. अश्लील व्हिडिओग्राफी संदर्भात राज कुंद्रा याला जून 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा मुंबई पोलीस अधिकाऱयांनी केला होता. दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये त्याला जामीन मिळाला होता. कुंद्रा आणि त्याच्या कंपनीने पॉर्न फिल्म्सच्या माध्यमातून बक्कळ कमाई केल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List