खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढणाऱ्या वाहतूक पोलिसांवर होणार कारवाई, जाणून घ्या संपूर्ण माहिती

खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढणाऱ्या वाहतूक पोलिसांवर होणार कारवाई, जाणून घ्या संपूर्ण माहिती

वाहनचालकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत अनेकवेळा सिग्नलवर वाहतूक पोलीस आपल्या खासगी मोबाईलवरून वाहनांचे फोटो काढताना दिसतात. स्वतःच्या खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढण्यास वाहतूक पोलिसांना मनाई आहे. मात्र अनेक वाहतूक पोलीस बऱ्याचदा हे नियम पाळताना दिसत नाही. मात्र यापुढे अशा प्रकारे खासगी मोबाईलने एखाद्या वाहनाचा पोलिसांनी फोटो काढल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. याबाबत स्वतः अप्पर पोलीस आयुक्त (वाहतूक) एम. रामकुमार यांनी माहिती दिली आहे.

ई-चलन मशीन दिलेली असतानाही वाहतूक पोलीस सर्रास आपल्या खासगी मोबाईलने फोटो काढताना दिसतात. यातच अनेकवेळा वाहनचालकाला आपल्यावर कारवाई का केली जात आहे, हेही कळत नाही. वाहतूक पोलिसांनी आपल्या खासगी मोबाईलने वाहनाचे फोटो टिपल्यानंतर वाहनचालकांच्या घरीच दंडाचे चलन पाठवले जाते. मात्र अशा प्रकारे आता वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली जाणार आहे.

याबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त (वाहतूक) एम. रामकुमार म्हणाले आहेत की, स्वतःच्या खासगी मोबाईलचा वापर करून वाहनाचे फोटो काढण्यास वाहतूक पोलिसांना मनाई आहे. अशा प्रकारे फोटो काढल्यास संबंधित वाहतूक पोलिसावर कारवाई केली जाणार आहे. याबाबत वाहनचालकांनी तक्रार करावी, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, अशा प्रकारचे आदेश दोन वर्षांपूर्वी राज्याच्या अप्पर पोलिस महासंचालकांनी दिले होते. मात्र त्याचे पालन अनेक पोलिसांकडून होताना दिसला नाही. यंदा तरी या नियमाचे पालन होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;