हौसेला मोल नसतं; नीता अंबानींची एवढीशी ‘पॉपकॉर्न बॅग’ पण किंमत ऐकून थक्क व्हाल

हौसेला मोल नसतं; नीता अंबानींची एवढीशी ‘पॉपकॉर्न बॅग’ पण किंमत ऐकून थक्क व्हाल

नीता अंबानी यांच्याबद्दल वेगळी अशी ओळख करून देण्याची गरज नाही. नीता अंबानी जर एखाद्या लग्नाला किंवा पार्टीला जात असतील तर अर्थातच सर्व माध्यमांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या असतात. कारण त्यांच्या कंपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत अन् चपलांपासून ते बॅगपर्यंत सगळ्याच गोष्टी या ब्रँडेड आणि युनिक असतात. साडी, दागिने, मेकअप, काहीही असो.. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांची फॅशनबाबत बातच वेगळी असते.

नीता अंबानींच्या ‘पॉपकॉर्न बॅग’ची चर्चा

नीता अंबानी यांना फॅशनची खूप आवड आहे. त्यांना घातलेल्या कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंतची चर्चा ही होतच असते. अशीच एक चर्चा झाली होती ती त्यांच्या बॅगची. मुंबईतील एका ब्युटी इव्हेंटमध्ये नीता अंबानी देखील होत्या.

इव्हेंटमध्ये अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. त्यात मात्र नीता अंबानींच्या पर्सचीच चर्चा होती. या इव्हेंटमध्ये नीता अंबानींची ‘पॉपकॉर्न बॉक्स स्टाइल’ बॅग होती. ही बॅग आकाराने जरी लहान दिसत असली तरी त्याची किंमत जाणून मात्र तुम्हालाही धक्का बसेल..

ब्रँडेड पॉपकॉर्न बॅगची किंमत ऐकून धक्का बसेल 

ही एक ब्रँडेड पॉपकॉर्न मिनॉडियर बॅग आहे. त्याची किंमत साधारण 24 लाख रुपये आहे. ही काळ्या आणि क्रीम रंगाची पॉपकॉर्न बॉक्स बॅग असून जिच्यावर मण्यासारख्या कॉर्न कर्नलची रचना आहे, हे या बॅगचे वैशिष्ट्य आहे.

ही बॅग एक नामांकित ब्रँडेडची आहे. नीता अंबानी यांच्याकडे जगातील जवळपास सर्व नामांकित ब्रँडची उत्पादने आहेत. या ब्रँडमध्ये अनेक मिनी आवृत्त्या उपलब्ध आहेत. मिनी व्हॅन सारख्या बॅगसह अनेक खास डिझाईन्स देखील या बॅगपॅटर्नमध्ये उपलब्ध आहेत.

इव्हेंटमध्ये नीता अंबानींसोबत त्यांची मुलगी ईशा अंबानीही सहभागी झाली होती. ईशा अंबानीकडे एक छोटी पर्स होती. ही पर्स जुडिथ लीबर बॅग ब्रँडची असून या पर्सचा आकार इतका लहान होता की या पर्समध्ये स्मार्टफोन ठेवणेही अवघड आहे. पण ही अतिशय बारीक आणि नाजूक असलेल्या पर्सची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे.

त्यामुळे नीता अंबानी असो किंवा ईशा अंबानी या लाखोंची किंमती असणाऱ्या एवढ्य़ाशा पर्स वापरणं म्हणजे खरच हौसेला मोल नसतं असंच य़ावरून दिसून येत.

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;