आदित्य ठाकरेंचं स्वप्न साकार, मलबार हिलवरून दिसणार मुंबईचा मनमोहक नजारा
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी 2021 ला ते पर्यटन मंत्री असताना मलबार हिल येथे नेचर ट्रेल प्रोजक्ट सुरू केला होता. अखेर हा प्रोजेक्ट लवकरच पूर्ण होणार असून येत्या जानेवारी महिन्यात त्याचे उद्घाटन केले जाणार असल्याचे समजते. याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
”2021 मध्ये मी पर्यटन मंत्री असताना सुरू केलेला प्रोजेक्ट पूर्ण होत आहे हे बघून आनंद होतोय. 2022-24 दरम्यान मिंधेंनी हा प्रोजेक्ट थांबवला होता. मात्र जेव्हा मी पत्रकारांना घेऊन प्रोजक्टच्या ठिकाणी भेट दिली त्यानंतर पुन्हा त्याचे काम सुरू करण्यात आले. या ठिकाणावरून मुंबईकरांना मलबार हिलच्या हिल स्लोपवरून चालण्याचा एक जबरदस्त अनुभव मिळणार आहे. तसेच तिथून गिरगाव चौपाटीचा मनमोहक नजारा देखील पाहायला मिळणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमध्ये लिहले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List