स्वत:च्या बिझनेससाठी वहिनीकडून ऐश्वर्याच्या नावाचा वापर?; चर्चांवर अखेर श्रीमा रायकडून स्पष्टीकरण

स्वत:च्या बिझनेससाठी वहिनीकडून ऐश्वर्याच्या नावाचा वापर?; चर्चांवर अखेर श्रीमा रायकडून स्पष्टीकरण

अभिनेत्री ऐश्वर्या रायचं खासगी आयुष्य सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि तिची वहिनी श्रीमा राय यांच्यातील नातं प्रकाशझोतात आलं आहे. श्रीमा ही इन्फ्लुएन्सर असून तिने सोशल मीडियावर कधीच वहिनी ऐश्वर्या किंवा आराध्यासोबतचा फोटो पोस्ट केला नसल्याची गोष्ट नेटकऱ्यांच्या लक्षात आली. यावरून अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ऐश्वर्याच्याही पेजवर माझा फोटो नाही, असं प्रत्युत्तर श्रीमाने दिलं होतं. हा वाद आता आणखी वाढला असून एका रेडिट युजरने श्रीमावर ऐश्वर्याच्या नावाचा वापर स्वत:च्या बिझनेस डील्ससाठी केल्याचा आरोप केला आहे. त्यावर आता श्रीमाने दिलेल्या स्पष्टीकरणाने सर्वांचं लक्ष वेधलंय.

एका रेडिट युजरने श्रीमावर निशाणा साधत लिहिलं होतं, ‘ती तिच्या काही बिझनेस डिल्ससाठी ऐश्वर्याच्या नावाचा गैरवापर करत असल्याच्या चर्चा होत्या ना? ऐश्वर्याला जेव्हा याबद्दल समजलं तेव्हा वाद झाले. तिचा भाऊ आणि त्याची पत्नी ऐश्वर्याच्या आईसोबत राहतसुद्धा नाहीत. सासूसोबतही ऐश्वर्याच्या वहिनीचे वाद आहेत.’ या कमेंटवर श्रीमाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shrima Rai 🧿 (@shrimarai)

श्रीमा रायचं स्पष्टीकरण-

“तथ्य.. माझा वाढदिवस 21 नोव्हेंबर रोजी होता आणि नेहमीप्रमाणे मला पुष्पगुच्छ पाठवले गेले. त्यांचे मी जाहीर आभार मानले. मी ब्लॉगर किंवा कंटेट क्रिएटर बनण्याआधी वेल्थ मॅनेजमेंटमध्ये अनेक वर्षं बँकर होती. मी ग्लॅडरॅग्स मिसेस इंडिया ग्लोब 2009 सुद्धा होते. 2017 नंतर मी ब्लॉगिंग करण्यास सुरुवात केली. मी कोणाच्याच नावाने कधीही व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला नाही. मी या गोष्टींचं स्पष्टीकरण देतेय कारण ही तथ्ये आहेत. मी स्वत:च्या जीवावर कंटेट क्रिकेटर म्हणून माझं करिअर बनवलं आणि एक महिला म्हणून या तथ्याशी छेडछाड करणाऱ्यांबद्दल मला वाईट वाटतं. याची खात्री माझा पती, सासू आणि आईवडिल देऊ शकतात. एक आई म्हणून माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की माझ्याशी नावाशी एखादा संबंध जोडला जात असेल तर त्याची तथ्ये स्पष्ट असावीत”, असं तिने म्हटलंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;