शोभिताला नागा चैतन्यच्या नावाची हळद लागली; पारंपारिक लूकमध्ये दिसले जोडपे
साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य लवकरच अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न करणार आहे. दोघांच्या लग्नाचे विधीही सुरू झाले आहेत. आज म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी या जोडप्याचा हळदी सोहळा संपन्न झाला. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा हळदी समारंभ त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला.
हळदी समारंभात या दोघांनीही पारंपारिक लूक केला होता. शोभिताने तिच्या हळदी समारंभासाठी आणि मंगलस्नानम विधीसाठी दोन पोशाख परिधान केले होते.
शोभिताने हळदीसाठी पिवळ्या रंगाचा सुंदर साडी नेसली होती. तसेच साडीला साजेसे सोन्याचे दागिनेही तिने घातले होते. फोटोंमध्ये ती हळदीच्या रंगात रंगलेली दिसत आहे.
हळदी समारंभात शोभिता हात जोडून खुर्चीवर बसली आहे आणि तिचे कुटुंबीय अभिनेत्रीवर पाणी ओतताना दिसत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.






Comment List