गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात, नऊ जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी

गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात, नऊ जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी

गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आता पर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. दुपारी बारा ते साडे बाराच्या सुमारास हा अपघात झाला.

गोंदियातील खजिरी गावाजवळ भंडाऱ्याहून गोंदियाकडे ही बस जात होती. तेव्हा ही बस उलटली आणि या बसला अपघात झाला गोंदिया जवळ साकोलीमजध्ये ही बस जात होती तेव्हा एका वळणावर अचानक एक बाईक आली. तेव्हा अपघात टाळण्यासाठी चालकाने ब्रेक दाबला आणि त्यातच अपघात झाला. त्यावेळी गाडीत 35 प्रवासी होते. या अपघातात 9 प्रवशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

अपघात झाल्यानंतर बाईकस्वार घटनास्थळाहून फरार झाला अशी माहिती उपस्थित नागरिकांनी दिली. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;