शिक्षकानं टोकाचं पाऊल उचललं; पत्नी-मुलीसह रेल्वेखाली झोकून दिलं, तिघांना एकाच चितेवर दिला मुखाग्नी

शिक्षकानं टोकाचं पाऊल उचललं; पत्नी-मुलीसह रेल्वेखाली झोकून दिलं, तिघांना एकाच चितेवर दिला मुखाग्नी

अहमदपूर तालुक्यातील किन्नी कदू येथील एका शिक्षकाने गुरुवारी टोकाचे पाऊल उचलले. दुपारी अडीचच्या सुमारास शिक्षकाने आपल्या कुटुंबासह स्वत:ला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. तिघांच्याही मृतदेहावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

गुरुवारी गंगाखेड शहरालगत असलेल्या धारखेड परिसरात शिक्षकाने कुटुंबासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मसनाजी तुडमे (वय – 53) या शिक्षकाने पत्नी रंजना मसनाजी तुडमे (वय – 35), मुलगी अंजली तुडमे (वय – 22) यांच्यासह रेल्वे खाली उडी घेतली. गोदावरी नदी पुलाच्या रेल्वे ट्रॅकवर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.

मसनाजी सुभाष तुडमे गंगाखेड शहरातील ममता माध्यमिक विद्यालयात शिक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी पत्नी आणि मुलीसह परळीकडे कोळसा घेऊन जाणाऱ्या रेल्वेखाली आत्महत्या केली. तिघांचेही मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आले. शुक्रवारी तिघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

तिघांना मुखाग्नी देताना ग्रामस्थांनी डोळ्यातील आसवांना वाट करुन दिली. गेल्या वर्षीच मसनाजी तुडमे यांच्या जावायाचे अपघाती निधन झाले होते. अवघ्या वर्षभरात त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;