Photo – अभिनेत्री रेश्मा शिंदे अडकली विवाहबंधनात, पाहा लग्नातील खास फोटो
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेश्मा शिंदे विवाहबंधनात अडकली आहे. नुकतेच तिने ‘आयुष्याची नवी सुरुवात’ अशी फोटोओळ टाकत लग्नातील खास क्षणांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तिचे केळवण, हळद, मेहंदीचे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत होती. लग्नातील फोटोंमध्ये रेश्माने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली असून तिचा नवरा पवनने शेरवानी, धोतर आणि गुलाबी रंगाचे उपरणे परिधान केले आहे. दोघंही या फोटोंमध्ये प्रचंड सुंदर दिसत असून चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List