बाजरीचे नूडल्स, ज्वारीचा रिसोटो, ग्लूटेन-फ्री रॅप्स; मलायकाच्या रेस्टॉरंटचे हेल्थी मेन्यूकार्ड, 90 वर्षे जुन्या वास्तुत सजलेलं सुंदर रेस्टॉरंट
पहिल्यांदाच मलायका अरोरा तिच्या ब्रेकअप आणि अर्जुन कपूरबद्दलच्या विषयांमुळे नाही तर दुसऱ्या कारणामुळे आता चर्चेत आली आहे.
मलायका अरोराने तिच्या आयुष्यात आता नवीन सुरुवात केली आहे. मलायकाने मुलगा अरहानबरोबर मिळून नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे.
‘स्कार्लेट हाउस’ असे या रेस्टॉरंटचे नाव असून हे रेस्टॉरंट मुंबईतील वांद्रे येथील 90 वर्षे जुन्या पोर्तुगीज बंगल्यात आहे.
शटर विंडो, व्हिक्टोरियन खुर्च्या, फ्लोरल इंटिरियर व ग्रामोफोन यामुळे रेस्टॉरंटचा लूक फारच वेगळा आणि आकर्षक ठरतोय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.









Comment List