थाटामाटात विवाह, डोळ्यात सुखी संसाराची स्वप्नं; पण लग्नाच्या पाचव्या दिवशीच नवविवाहितेचा करुण अंत

थाटामाटात विवाह, डोळ्यात सुखी संसाराची स्वप्नं; पण लग्नाच्या पाचव्या दिवशीच नवविवाहितेचा करुण अंत

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नानंतर पाचव्या दिवशीच नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. अंघोळीला गेली असता बाथरुमधील गिझर फुटल्याने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.

बरेलीतील एका गावात राहणाऱ्या दीपकचा 22 नोव्हेंबर रोजी बुलंदशहर येथील दामिनी नामक तरुणीशी विवाह झाला. यानंतर पाट दिवसांनी म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी दामिनी नेहमीप्रमाणे सकाळी अंघोळीला गेली. मात्र बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही म्हणून पतीने दरवाजा ठोठावला. पण आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता.

अखेर घरच्यांनी दार तोडून पाहिले असता आत दामिनी जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेली दिसली. घरच्यांनी तिला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;