ठरलं तर… सलमान खानच्या वाढदिवशी चाहत्यांना पाहायला मिळणार ‘सिकंदर’चा फर्स्ट लूक

ठरलं तर… सलमान खानच्या वाढदिवशी चाहत्यांना पाहायला मिळणार ‘सिकंदर’चा फर्स्ट लूक

बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान ‘टायगर 3’ सिनेमा चाहत्यांवर जादू चालवू शकला माही. मात्र लवकरच तो एका नव्या सिनेमात वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. ‘गजनी’ सिनेमाचे दिग्दर्शक ए.आर.मुरुगदास यांच्यासोबत आगामी सिनेमा ‘सिकंदर’ची त्याने घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांना सलमान खान आणि दिग्दर्शक मुरुगदास यांची जोडी कशी असणार आहे याची उत्सुकता लागली आहे.

‘सिकंदर’ सिनेमाचे आतापर्यंत फोटो समोर आले नसल्याने चाहत्यांना या सिनेमाची जास्त उत्सुकता आहे. मात्र लवकरच , सलमान आपल्या चाहत्यांना ‘सिकंदर’ सिनेमाबाबतची मोठी अपडेट शेअर करणार आहेत. सलमानचा वाढदिवस अगदी जवळ आला आहे. 27 डिसेंबरला त्याच्या वाढदिवशी सलमान ‘सिकंदर’ सिनेमातील पहिला लूक आणि पहिले अधिकृत पोस्टर चाहत्यांना शेअर करणार आहे. प्रोडक्शनच्या जवळच्या एका सूत्राने इंडिया टुडेला सांगितले की, ‘टीम सध्या ॲक्शन सीक्वेन्स शूट करण्यात व्यस्त आहे.

दरम्यान, ‘सिकंदर’च्या टीमने हैदराबादमध्ये सिनेमाचे काही प्रमुख सीक्वेन्स पूर्ण केले आहेत आणि तर सिनेमाची अखेरची शुटींग मुंबईत पूर्ण केली जाणार आहे, 2025 च्या ईदला हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. ॲक्शन पॅक्ड सिक्वेन्सने भरलेल्या या सिनेमात सलमान पूर्णपणे नव्या अवतारात दिसणार आहे. ‘सिकंदर’नंतर सलमान ‘जवान’ दिग्दर्शक ॲटलीसोबत सिनेमात काम करणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;