शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, घर आणि कार्यालयावर ईडीकडून पुन्हा छापेमारी
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा आणि राज यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने शुक्रवारी पुन्हा छापे टाकले. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यासह त्यांच्याशी संबंधित अन्य काही लोकांच्या घरावरही ईडीकडून छापेमारी सुरू आहे. ईडीने 15 ठिकाणी छापे टाकले आहेत.
मोबाईल अॅपद्वारे पोर्न कंटेंट बनवून प्रसारीत केल्याप्रकरणी 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणात देशात जमवलेला पैसा या व्हिडिओच्या माध्यमातून परदेशात हस्तांतरीत करण्यात आला. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात पैसे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आले असून, आता ईडीकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
पोर्नोग्राफी प्रकरणी 2021 मध्ये राज कुंद्रा यांना अटक झाली होती. दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर कुंद्रा यांना जामिन देण्यात आला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List