चिकन बिर्याणीत सापडले सिगारेटचे बट, हैदराबादच्या रेस्टॉरंटमधील धक्कादायक प्रकार, व्हिडिओ व्हायरल
हैदराबादमधील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्राहकांना सर्व्ह केलेल्या चिकन बिर्याणीमध्ये सिगारेटचे बट आढळले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तरुणांचा एक ग्रुप हैदराबादमधील आरटीसी एक्स रोडवरील प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये चिकन बिर्याणी खायला गेला होता. जेव्हा त्यांना बिर्याणी खायला सुरुवात केली तेव्हा त्यांना त्यात सिगारेटची बट आढळली. ज्या तरुणाच्या प्लेटमध्ये सिगारेट आढळली त्याने सिगारेटच्या बटमधून धूर निघत होता असा दावा केला आहे.
चिकन बिर्याणीत बट आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत काही तरुण हॉटेलमध्ये बसून बिर्याणी खाताना दिसत आहे. एक तरुणाच्या ताटात सिगारेटची बट दिसत आहे. यानंतर ग्राहक रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांवर ओरडताना दिसत आहेत. यानंतर रेस्टॉरंटमधील व्यवस्थापनाने तरुणांची माफी मागितली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List