लग्नसमारंभाला जात असताना कार कालव्यात उलटली, चौघांचा मृत्यू; तीन जखमी

लग्नसमारंभाला जात असताना कार कालव्यात उलटली, चौघांचा मृत्यू; तीन जखमी

लग्नसमारंभाला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात पलटी झाली. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिहारमधील सदर पोलीस ठाण्याअंतर्गत प्रसादी इंग्लिश दुन्ना छपराजवळ हा अपघात घडला.

जखमींची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृतांमध्ये नवरदेवाचे बहिण आणि भावोजीचा समावेश आहे. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. कारमधील कुटुंब लग्नासाठी अरवालहून पाटणाला चालले होते. मात्र वाटेतच काळाने घाला घातला आणि ऐन समारंभाच्या दिवशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

कार कालव्यात पडल्यानंतर बचावासाठी आतील लोकांचा आरडाओरडा सुरू होता. यादरम्यान औरंगाबादच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने अपघातग्रस्त वाहन पाहिले. आतून किंचाळण्याचे आवाज येत असल्याने त्यांनी तात्काळ सदर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;