मालाडमध्ये मोबाईलच्या वादातून शेजाऱ्याने 16 वर्षाच्या मुलाला संपवले

मालाडमध्ये मोबाईलच्या वादातून शेजाऱ्याने 16 वर्षाच्या मुलाला संपवले

मोबाईलवरून झालेल्या वादातून शेजाऱ्याने 16 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना मालाडमध्ये घडली आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फरदीन युनूस खान असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी 20 वर्षीय आरोपीला अटक केली असून आमिर गुल्लू साजेदा असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरदीन आणि आमिर दोघेही शेजारी राहतात. फरदीनने कथितरित्या आमिरचा मोबाईल घेतला होता. पण तो परत करण्यास अयशस्वी झाला. यावरून दोघांमध्ये बुधवारी दोघांमध्ये वादावादी झाली. हळूहळू वादावादीचे हाणामारीत पर्यावसन झाले. यादरम्यान आमिरच्या नाकाला दुखापत झाली. यामुळे संतापलेल्या आमिरने फरदीनवर चाकूहल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला.

जखमी फरदीनला तात्काळ एमडब्ल्यू देसाई रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, मात्र गुन्ह्यात वापरलेले हत्यार अद्याप हस्तगत करण्यात आले नाही. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, त्याच्यावर दिंडोशी पोलीस ठाण्यात तीन आणि वनराई पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;