वाहतूक पोलिसांच्या मनमानीला चाप! हायकोर्टात अपर पोलीस महासंचालकांचे परिपत्रक सादर, शिस्तभंगाची कारवाई होणार

वाहतूक पोलिसांच्या मनमानीला चाप! हायकोर्टात अपर पोलीस महासंचालकांचे परिपत्रक सादर, शिस्तभंगाची कारवाई होणार

नियम मोडणाऱ्यांचे वाहन जप्त करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या मनमानीला चाप बसवणारे परिपत्रक अपर पोलीस महासंचालकांनी जारी केले आहे. चलानचा खटला दाखल असल्यास संबंधित वाहन जप्त करण्यासाठी वाहतूक पोलिसांना परवानगी घ्यावी लागणार आहे, असे हे परिपत्रक सांगते. महत्त्वाचे म्हणजे परिपत्रकानुसार कार्यवाही करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे

अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) सुरेश कुमार मेकला यांनी जारी केलेले हे परिपत्रक न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सादर करण्यात आले. या परिपत्राकातील भाषा सामान्य माणसाला कळणार नाही. सर्वसामान्याला कळेल असे सोपे परिपत्रक जारी करा, जेणेकरून कशा पद्धतीने वाहतूक पोलीस काम करतात हे सर्वांना कळेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

आता जारी केलेले परिपत्रक मागे घ्या. नव्याने सोप्या भाषेतील परिपत्रकाचा मसुदा तयार करा. हा मसुदा न्यायालयात सादर करा. त्यात काही बदल असल्यास आम्ही सांगू. त्यानंतरच नवीन परिपत्रक जारी करा, असेही खंडपीठाने वाहतूक पोलिसांना सांगितले. यावरील पुढील सुनावणी 11 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे.

काय आहे परिपत्रक

ई-चलान कारवाई अन्वये खटला दाखल केल्यावर केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम क्रमांक 167 (8) नुसार वाहन जप्तीची परवानगी मिळाल्याशिवाय वाहन जप्तीची कारवाई करू नये, असे फर्मान या परिपत्रकाद्वारे सर्व वाहतूक पोलिसांना जारी करण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासाठी परिपत्रक हवे

हे परिपत्रक केवळ मुंबईसाठी जारी करू नका. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे परिपत्रक काढा, म्हणजे ई-चलानची कारवाई अधिक पारदर्शक होईल, असे न्यायालयाने नमूद केले.

कोणत्याही गणवेशातील पोलीस म्हणजे काय?

कोणत्याही गणवेशातील अधिकारी ई-चलान जारी करेल, असे या परिपत्रकात नमूद आहे. यावर न्यायालय संतप्त झाले. कोणत्याही गणवेशातील पोलीस अधिकारी म्हणजे काय, याचा काय अर्थ होतो. प्रत्येक पोलिसाच्या गणवेशाचा रंग एकच असला तरी हुद्दय़ानुसार त्यात बदल असतो. असे कठीण परिपत्रक लोकांना कळणार नाही, असे न्यायालयाने अपर पोलीस महासंचालकांना फटकारले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;