शिवसेना आमदार महेश सावंत रुग्णालयात

शिवसेना आमदार महेश सावंत रुग्णालयात

माहीम विधानसभेतील शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांना छातीत दुखू लागल्याने आज वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर ऑन्जिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

महेश सावंत यांना आज सकाळी छातीत अचानक दुखू लागल्याने तातडीने माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची ऑन्जिओग्राफी करण्यात आली. त्यांच्या हृदयातील रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असल्याचे निदान झाले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सायंकाळी लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे हृदयरोगतज्ञ डॉ. अजित मेनन यांच्या नेतृत्वाखालील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने महेश सावंत यांच्यावर ऑन्जिओप्लास्टी केली. महेश सावंत यांची प्रकृती ठीक असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश सावंत यांनी माहीम मतदारसंघातील हायव्होल्टेज लढतीत विरोधकांचा धुव्वा उडवून दणदणीत विजय मिळवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;