धावत्या रुग्णवाहिकेत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; चालकासह दोघांना अटक, मामा फरार
एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर धावत्या रुग्णवाहिकेत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. या मुलीच्या मामे बहिणीच्या नवऱ्याने आणि त्याच्या मित्राने बलात्कार केला. त्यानंतर रुग्णवाहिका चालकाने तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. मुलीच्या मामादेखत ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी चालकासह दोघांना अटक केली आहे. मामा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
22 नोव्हेंबरला हनुमान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडितेने याप्रकरणी चार जणांविरोधात पोलिसांत तक्रार दिली. पीडितेने मामा, तिची बहीण, मामे बहिणीचा नवरा आणि रुग्णवाहिका चालकाविरोधात तक्रार दिली. पीडितेने पोलिसांसमोर धक्कादायक माहिती उघड केली. 22 नोव्हेंबरला मामाची मुलगी घरी आली. तिने तिच्या घरी येण्यासाठी म्हणजेच तिच्या सासरी येण्यासाठी आग्रह धरला. पीडिता तिच्या घरी जाण्यासाठी तयार झाली. यानंतर सगळे त्या रुग्णवाहिकेत बसले. रुग्णवाहिकेच्या पुढच्या सीटवर मुलीचा मामा आणि त्यांचा जावई असे दोघे बसले होते. काही वेळ प्रवास केल्यानंतर या मुलीची बहीण पाणी हवे आहे म्हणून खाली उतरली. रात्रीची वेळ आणि चालक डोंगरभाग असलेल्या भागांतून रुग्णवाहिका घेऊन चालला होता. त्याच वेळी चालकाने आणि पीडितेच्या बहिणीच्या नवऱ्याने तिच्या मामादेखत तिच्यावर बलात्कार केला.
आईचा तक्रारीस होता नकार
पहाटे पाचच्या सुमारास या मुलीला तिच्या घराच्या जवळच्या परिसरात सोडण्यात आले. पीडितेने घडलेला सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर पीडितेच्या आईने आपली बदनामी होईल. जे झालं ते कुठे बोलू नकोस असं त्या मुलीला सांगितले; परंतु या मुलीला चीड आलेली होती. त्यामुळे घडल्या प्रकाराबाबत तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List