शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत रुग्णालयात दाखल
माहिम मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार महेश सावंत यांना छातीत दुखू लागल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
महेश सावंत गुरुवारी सकाळी अस्वस्थ वाटत होते त्यामुळे त्यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन तपासण्या केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List