IND Vs PAK – कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार! 30 नोव्हेंबरला रंगणार हिंदुस्थान-पाकिस्तान हायहोल्टेज सामना

IND Vs PAK – कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार! 30 नोव्हेंबरला रंगणार हिंदुस्थान-पाकिस्तान हायहोल्टेज सामना

हिंदुस्थान आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 30 नोव्हेंबरला हायहोल्टेज सामना रंगणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. Asia Cup Under 19 च्या निमित्ताने दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. 29 नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून संपूर्ण स्पर्धा युएईमध्ये पार पडणार आहे.

Asia Cup Under 19 या स्पर्धेच्या 11 व्या हंगामाला 29 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेत्या बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघामध्ये शारजहा क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेसाठी 8 संघांनी सहभाग घेतला असून त्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. टीम इंडियाचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. अ गटामध्ये टीम इंडिया व्यतिरिक्त पाकिस्तान, जपान आणि युएई या संघांचा समावेश आहे. टीम इंडियाचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध दुबई येथे रंगणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड मानले जात आहे. त्यानंतर टीम इंडिया 2 डिसेंबरला शारजहाच्या मैदानावर जपानविरुद्ध आणि 4 डिसेंबरला युएईविरुद्ध भिडणार आहे.

टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 08 वेळा आशिया चषक उंचावण्याची किमया साधली आहे. त्यामुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण करण्याची संधी आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हिंदुस्थानी प्रमाण वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता खेळवले जाणार आहेत. तसेच अंतिम सामना 8 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;