मध्य प्रदेशमध्ये 16 वर्षाच्या मुलीवर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये सामूहिक बलात्कार, मामाने रचला कट

मध्य प्रदेशमध्ये 16 वर्षाच्या मुलीवर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये सामूहिक बलात्कार, मामाने रचला कट

मध्य प्रदेशमध्ये एका 16 वर्षाच्या मुलीवर तिच्या मामाच्या सांगण्यावरून त्याच्या जावयाने व एका मित्राने धावत्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मामाच्या जावयाला व अ‍ॅम्ब्युलन्स चालक असलेल्या त्याच्या मित्राला अटक केली आहे. तर मामा व मामाची मुलगी हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

22 नोव्हेंबर रोजी सदर मुलगी तिच्या मामे बहिणीसोबत अ‍ॅम्ब्युलन्समधून तिच्या सासरी जात होती. या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये मुलीचा मामा, त्याची मुलगी, जावई असे सर्व प्रवास करत होते. मामा व जावई चालकासोबत पुढे बसलेले तर पीडित मुलगी व तिची मामे बहिण मागे बसलेले. त्यांची अ‍ॅम्ब्युलन्स घाटावर आली असता मामे बहिणीने पाणी पिण्याच्या बहाण्याने गाडी थांबवली व ती पुढे निघून गेली. त्यानंतर बहिणीचा नवरा व चालक मागे आले व त्यांनी आळीपाळीने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी मुलीला पुन्हा तिच्या घराजवळ नेऊन टाकले. सदर घटना कुटुंबातील वादामुळे झाल्याचे समजते.

या प्रकरणी मुलीने तिच्या मामा सह चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मामाच्या जावयाला व त्याच्या मित्राला अटक केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;