‘पुष्पा 2’ ने रिलीजपूर्वीच कमाईचा रचला इतिहास, या 5 चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड

‘पुष्पा 2’ ने रिलीजपूर्वीच कमाईचा रचला इतिहास, या 5 चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड

अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘पुष्पा 2 द रुल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा असून, येत्या 5 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात धमाल उडणार आहे.

अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाला अमेरिकेत चांगला प्रतिसाद मिळत आहे, कारण रिलीजपूर्वीच चित्रपटाने तेथे सुमारे 1.4 मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की, चित्रपटाने थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वीच शाहरुख खानच्या जवान आणि पठाणसह रामचरण आणि जूनियर एनटीआरच्या आरआरआरला मागे टाकले आहे.

या चित्रपटांना सोडलं मागे

पुष्पा 2 द रुलने रिलीज होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कोईमोईच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने शाहरुख खानच्या पठाण ते केजीएफला मागे टाकले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत मागे टाकलेल्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊ…

1. जवान: 55 कोटी
2. पठाण: 55 कोटी
3. केजीएफ 2: 42.50 कोटी रुपये
4. ॲनिमल: 41.50 कोटी
5. बाहुबली 2: 38 कोटी

पुष्पा 2 किती भाषांमध्ये होणार प्रदर्शित?

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा द रुल’ हा चित्रपट 5 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ, कन्नड, बंगाली आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ॲडव्हान्स बुकिंग पाहता हा चित्रपट 2024 सालचा सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट ठरू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;