मलायका अरोराच्या आयुष्यात नवी एन्ट्री; फोटो शेअर करत दिली ‘गुड न्यूज’

मलायका अरोराच्या आयुष्यात नवी एन्ट्री;  फोटो शेअर करत दिली ‘गुड न्यूज’

मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर नेहमीच चर्चेत राहिली आहे.कधी त्यांच्या एकमेकांच्या वक्तव्यामुळे तर कधी ती शेअर करत असेलल्या तिच्या फोटोंमुळे. आताही असाच एक फोटो मलायकाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे.

मलायकाने शेअर केलेल्या फोटोमुळे तिच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार असल्याचे दिसून आले आहे. मलायकाचा हा फोटो मुलगा अरहानसोबतचा असून तिने त्याच्यासोबत मुंबईत स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली.

मलायकाने मुलगा अरहानबरोबर मिळून नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. ‘स्कार्लेट हाउस’ असं या रेस्टॉरंटचे नाव आहे. हे सुंदर रेस्टॉरंट वांद्रे येथील 90 वर्ष जुन्या पोर्तुगीज बंगल्यात तयार करण्यात आलं आहे. हे रेस्टॉरंट बोल्ड स्कार्लेट रंगात रंगवलेले आहे. हे रेस्टॉरंट खूपच सुंदर दिसत आहे. शटर विंडो, व्हिक्टोरियन खुर्च्या, फ्लोरल इंटिरियर व ग्रामोफोन यामुळे रेस्टॉरंटचा लूक लक्ष वेधून घेतो.

बीना नोरोन्हा या रेस्टॉरंटच्या मुख्य शेफ आहेत. त्या स्वतः मलायकासाठी हेल्दी पदार्थ बनवतात. रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये हंगामी फळांचा समावेश असलेले सॅलड्स, बाजरीचे नूडल्स, जपानी कॉफी ग्रेड मॅचा, ग्लूटेन-फ्री रॅप्स आणि ज्वारीचा रिसोटो यासारख्या पदार्थांचा समावेश असणार आहे. मलायकाने पोस्ट शेअर केलेल्या या गुड न्यूजमुळे चाहतेही खूप खूश आहेत. तिच्या पोस्टवर कमेंट्स करून तिला या व्यवसायासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय झालेली पाहायाला मिळते. ती इन्स्टाग्रामवर अनेक पोस्ट शेअर करत असते. “ज्यांना मी आवडत नाहीत त्यांच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. कारण जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्याबरोबर मी खूप व्यस्त आहे,” अशा आशयाची पोस्ट तिने नुकतीच केली होती. त्यामुळे ती या सगळ्यांमधून बाहेर पडत आपलं एक नवं आयुष्य सुरु करण्यासाठी तयार आहे हेच दिसून येत.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;