जनमत चोरणाऱ्यांना देश आणि जनता माफ करणार नाही – संजय राऊत
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात ईव्हीएम मशिन्स हॅक करून मतांमध्ये फेराफेर झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केला आहे. अनेक ठिकाणी झालेल्या मतदानापेक्षा अधिक मतं आढळून आली आहेत, तर काही ठिकाणी मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदान झाल्याचे समोर आले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत महायुती व निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, ”जनमत चोरणाऱ्यांना देश आणि जनता माफ करणार नाही. पहात रहा, पुढे पुढे काय होणार?” असा इशारा त्यांनी या पोस्टमधून दिला आहे. या पोस्टसोबतच त्यांनी एक फोटो ही शेअर केला आहे. ज्यावर ”ज्यांचा ईव्हीएम, त्यांची डेमोक्रसी.” असं लिहलेलं आहे.
जनमत चूरानेवालेको देश और जनता कभी माफ नहीं करेगी.
देखते रहो; आगे क्या क्या होता है!
जय हिंद! pic.twitter.com/KxMKmz6dLs— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List