आलिया भटला किशोर कुमार माहितच नव्हते; रणबीरने भर कार्यक्रमात सांगितला तो किस्सा

आलिया भटला किशोर कुमार माहितच नव्हते; रणबीरने भर कार्यक्रमात सांगितला तो किस्सा

 

आलिया भट आणि रणबीर हे त्यांच्या लेकीमुळे म्हणजे राहामुळे आता जास्त चर्चेत असतात. तसेच एकमेकांबद्दलचे किस्से सांगतानाही दिसतात. असाच एक आलियाबद्दलचा एक किस्सा रणबीरने भर कार्यक्रमात सांगितला पण त्या किस्सावरून आलियाला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

“आलियाला किशोर कुमार कोण हे माहित नव्हतं”

इफ्फीत एका कार्यक्रमात रणबीरने आलियाचा एक किस्सा सांगितला त्यावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. रणबीरचा किस्सा ऐकून नेटकऱ्यांनी आलियाला मात्र चांगलच ट्रोल केलं आहे. तो म्हणाला “आलियाला मी पहिल्यांदा भेटलो होतो तेंव्हा तिने विचारलं होतं की, किशोर कुमार कोण आहेत?” हा किस्सा सांगत सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि संगीतकार अभिनेता किशोर कुमार आलियाला माहितच त्यांनं सांगितलंय. पणजीमध्ये सुरु असलेल्या इफ्फी चित्रपट महोत्सवात रणबीर बोलत होता.

पुढे रणबीर म्हणाला “मी जेंव्हा आलियाला भेटलो तेंव्हा तिनं मला विचारलं होतं किशोर कुमार कोण आहेत? तर आयुष्याचं वर्तुळ असं असतं. लोक कलाकारांना विसरतात. मग नवे कलाकार येतात. त्यामुळे आपली मुळं लक्षात ठेवायला हवीत” असं रणबीर या व्हिडिओत म्हणताना दिसतोय. राज कपूर यांचा वारसा चालवणाऱ्या रणबीरनं इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये राज कपूर यांनं त्यांचे चित्रपट, सिनेमाच्या विचारावर प्रकाश टाकला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)


लिपस्टीक व्हिडीओचा बदला घेतल्याचं नेटकरी म्हणाले

रणबीरने हा किस्सा सांगितल्यानंतर आलियाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. दरम्यान काही जणांनी तर रणबीर आलियाचा बदला घेतोय अशीही कमेंट केली आहे . कारण काही महिन्यांपूर्वी एका व्हिडीओमध्ये आलिया भट्टनं ती लीपस्टीक लावते तेंव्हा रणबीर तिला लिपस्टीक पुसुन टाकायला सांगतो. त्याला आलियाच्या नैसर्गिक ओठांचा रंग आवडतो असं तिनं सांगितलं होतं .

यावर सोशल मीडियावर रणबीरला नेटकऱ्यांनी टॉक्सिक म्हणून ट्रोल केलं होतं. आता रणबीरच्या या वक्तव्यावरून तो आलियाच्या लिपस्टीकच्या ‘वाईप इट आऊट’ व्हिडिओचा बदला घेतल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. एकानं लिहिलं “रणबीर आणि आलिया कोण कोणाला लाज आणेल अशा स्पर्धेत आहेत. दोन्ही नवरा बायको एकमेकांचा बदला घेतायत”

नेटकऱ्यांकडून ट्रोल 

दरम्यान “रणबीर व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंटस या व्हिडीओवर केल्या आहेत. आता घरी गेल्यावर भांडी वाजणार असं एकानं लिहिलंय तर एकानं जेंव्हा एका नात्यात तुम्ही तुमच्या पत्नीपेक्षा दहा वर्षांनी मोठे असता तेंव्हा असे प्रसंग येतात असं लिहिलंय.

अनेकांनी रणबीरला बायकोचा अपमान केल्याबद्दल ट्रोल केलंय. तर,अनेकांनी आलिाची बाजू घेत म्हटलं आहे की, दोघांची भेट आलिया तेव्हा ती 9 वर्षांची झाली.त्यामुळे नक्कीट तिला माहित नसणार असं म्हणतं तिला ट्रोल करणाऱ्यांनी उत्तर दिलं आहे.यावर आलियाने मात्र कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;