सलमान खान स्टारर ‘वॉन्टेड’ सिनेमातील महेक 15 वर्षांनंतर कशी दिसते? ओळखणं देखील कठीण

सलमान खान स्टारर ‘वॉन्टेड’ सिनेमातील महेक 15 वर्षांनंतर कशी दिसते? ओळखणं देखील कठीण

Salman Khan: अभिनेता सलमान खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने एकापेक्षा एक सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. एवढंच नाही तर, सलमान खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केल्यामुळे अनेक नव्या सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. सलमान खान स्टारर ‘वॉन्टेड’ सिनेमात अभिनेत्री आयेशा टाकिया, अभिनेते – दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि प्रकाश राव मुख्य भूमिकेत होते. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वॉन्टेड’ सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं.

‘वॉन्टेड’ सिनेमा 35 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला. पण सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 87.42 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. सिनेमा सुपरहीट सिनेमांच्या यादीत देखील सामिल झाला. चाहत्यांनी फक्त सिनेमालाच नाहीतर, सिनेमातील गाण्यांना देखील डोक्यावर घेतलं.

सिनेमातील गाणी आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. सिनेमातील एक गाणं असं आहे, ज्यावर स्वतः सलमान खानने दमदार डान्स केला आहे. त्या गाण्याचं नाव आहे, ‘ले ले मजा ले…’, सिनेमातील हे गाणं अभिनेत्री महेक चहल हिच्यावर चित्रित करण्यात आलं. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीला आणि गाण्याला प्रचंड प्रेम दिलं. पण 15 वर्षानंतर महेक हिला ओळखणं देखील कठीण झालं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahekk Chahal (@maheckchahal)

 

महेक हिने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये महेक प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे. अभिनेत्रीच्या स्टाईल आणि हेअरकटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे… फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘मला नाही माहिती टाईट काय आहे माझी पोनीटेल की माझी लेगिंग्स…’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अभिनेत्री महेक चहल

अभिनेत्री महेक चहल ही एक भारतीय नॉर्वेजियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे, जिने हिंदी, तेलुगू, बंगाली, पंजाबी आणि नॉर्वेजियन सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने नागिन आणि सीआयडी सारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘नागीन 6’ मालिकेमुळे देखील महेकच्या लोकप्रियतेत वाढ झाली. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;