‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत अनपेक्षित वळण; एजे लीलाला घराबाहेर काढणार?

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत अनपेक्षित वळण; एजे लीलाला घराबाहेर काढणार?

काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करतात. या मालिकांमधील पात्र प्रेक्षकांना आपल्या घरातील वाटायला लागतं. अशी एक मालिका म्हणजे झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत काय घडतं? काय बिघडतं? याकडे प्रेक्षकांचं लक्ष असतं. आता या मालिकेत अनपेक्षित वळण आलं आहे. लीलाच्या घर चालवण्याचा अंदाज पाहून एजे प्रभावित होणार आहे. लीलाच्या हातात जहागीरदारांच्या घराच्या किल्ल्या देण्यात आल्या आहेत. आता दुर्गाचा प्रतिक्रिया काय असेल? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेला नवं वळण

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत लीला आणि रेवतीचा झालेल्या अपघाताने खूप गोष्टींचा उलगडा झाला आहे. लीला ठरवते की यश सापडल्याशिवाय ती घरात परत येणार नाही. एजे आणि लीला एकत्र येऊन यशचा शोध घेतायत, पण आता दुर्गा त्याला विरोध करते. दुर्गा, लीलावर यशच्या आयुष्याशी खेळ केल्याचा आरोप करते. लीला इथे पाहिली तर मी हे घर सोडून जाईन, असं ती ठामपणे सांगते. त्यामुळे आता एजे लीलाला घराबाहेर काढणार? की सुनांना घराबाहेर काढणार? हे पाहावं लागणार आहे.

एजेने दिलेला सल्ला लीला ऐकणार का?

एजे आणि सरोजिनी सोडून सगळेजण दुर्गाच्या बाजूने आहेत. शेवटी, लीला घर सोडून जाते आणि पुन्हा एजे आणि लीलामध्ये दुरावा निर्माण होतो. मात्र, विश्वरूपच्या मदतीने ते दोघं पुन्हा एकत्र येतात. याच दरम्यान किशोर आणि विक्रांत एका योजनेवर काम करतायत ज्यावर त्यांचे मतभेद होतात. एजे लीलाला त्याच्या रेस्टॉरंट पुन्हा जॉईन करण्याचा सल्ला देतो. लीलाला रेस्टॉरंटमधील घोटाळ्याचा संशय आलाय.

प्रमोद आणि विराज हे त्या घोटाळ्याचे मुख्य चेहरे आहेत. पण लीला त्यांना निर्दोष मानते. प्रमोद आणि विराज तिच्या या विश्वासाने प्रभावित होऊन लीलाला पुन्हा घरी आणण्याची मागणी करतात. लीला पुन्हा घरी परातल्याच कळताच, आपलं अस्तित्व घरच्या लोकांना कळावं म्हणून दुर्गा घराबाहेर पडते. सरोजिनी घराच्या किल्ल्या लीलाच्या हातात देते, ज्यामुळे दुर्गाचा जळफळाट होतोय. लीला तिच्या मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे घर चालवते, ज्यामुळे एजे प्रभावित होतो. पण सुना मात्र तिच्यावर चिडल्यात. त्यामुळे आता एजे काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;