पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबईतील महिलेला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबईतील महिलेला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आल्याने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून सदर महिलेने मोदींच्या हत्येची योजना आखल्याचा दावा केला. हत्येसाठी हत्यारांची व्यवस्थाही आधीच करण्यात आल्याचे महिलेने सांगितले.

आंबोली पोलिसांनी तात्काळ अ‍ॅक्शन मोडवर येत कॉल ट्रेस करून महिलेला अटक केली आहे. महिलेची चौकशी केल्यानंतर तसेच तिची पार्श्वभूमी तपासल्यानंतर कोणतेही संशयास्पद कनेक्शन आढळले नाही.

सदर महिला कौटुंबिक समस्यांमुळे तणावाखाली होती. या तणावातूनच तिने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात असे समोर आले आहे. मात्र संभाव्य धोके टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरूच आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;