यामी गौतममुळे मोडला सलमान खानच्या बहिणीचा संसार, म्हणाली, ‘दोघांमध्ये यामी आली आणि…’

यामी गौतममुळे मोडला सलमान खानच्या बहिणीचा संसार, म्हणाली, ‘दोघांमध्ये यामी आली आणि…’

Yami Gautam Love Life: अभिनेत्री यामी गौतम आता तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. अभिनेत्री पती आणि मुलासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेता सलमान खान याची मानलेली बहीण श्वेता रोहिरा हिने यामी हिच्यावर गंभीर आरोप केले होते. श्वेता हिचं लग्न अभिनेता पुलकीत सम्राट याच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण यासाठी श्वेता हिने यामी हिला जबाबदार ठरवलं.

एका मुलाखतीत श्वेता हिने यामीवर गंभीर आरोप केले होते. श्वेता म्हणाली होती, ‘पुलकीत आणि मी एकमेकांवर प्रचंड प्रेम करत होतो. पण लग्नाच्या 8 महिन्यांनंतर पुलकीत याला वेगळं व्हायचं होतं. याचं कारण त्याने मला त्याचं कुटुंब सांगितलं होतं. मी त्याला अनेकदा समजावलं, तू चांगला जावई आहेस… मी देखील चांगली सून होण्याचा प्रयत्न करेल… पण काही दिवसांनंतर मला कळलं होतं की, पुलकीतला काही दुसरंच हवं आहे…’

पुलकीत आणि यामी यांच्या अफेअरच्या चर्चांवर श्वेता म्हणाली, ‘मला दोघांच्या अफेअरबद्दल काहीही माहिती नव्हतं. पण बाहेर चर्चांनी जोर धरला होता. चर्चा फक्त अफवा आहेत असं मला वाटलं. कारण पुलकीत याला मी ओळखत होती. त्याला यामीसोबत सिनेमात काम देखील नव्हतं करायचं… दोघांनी एका म्यूझीक अल्बमसाठी काम केलं होतं, तेव्हा पुलकीत तिच्यासोबत बोलला देखील नाही. पण यामी कायम पुलकीतवर नजर ठेवून असायची…’

‘यामीमुळे माझा संसार मोडला. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. रंगणाऱ्या चर्चांमध्ये तथ्य होतं मला नंतर कळलं. आमच्या दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण तिसरा आल्यामुळे आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. माझं मिसकॅरेज झाल्यानंतर यामी आणि पुलकीत यांच्याच जवळीक निर्माण झाली…’ असं देखील श्वेता म्हणाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

 

सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना यामी हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. अखेर अभिनेत्रीने आदित्य धर याच्यासोबत लग्न केलं. दोघांनी 4 जून 2021 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर यामीने मुलाला जन्म दिला. तर पुलकीत याने अभिनेत्री क्रिती खरबंदा हित्यासोबत दुसरं लग्न केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;