दिल्लीतील प्रशांत विहारमध्ये पीव्हीआरजवळ भीषण स्फोट, पोलिसांकडून तपास सुरू
दिल्लीतील प्रशांत विहारमध्ये पीव्हीआरजवळ गुरुवारी भीषण स्फोट झाला. एका दुकानात हा स्फोट झाल्याची माहिती मिळते. स्फोटाची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हा कोणत्या प्रकारचा स्फोट आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्फोटाबाबत कॉल करणाऱ्या व्यक्तीचीही ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, प्रशांत विहारच्या बन्सी स्वीट्समध्ये सकाळी 11.48 वाजता पीसीआर कॉलवर संशयास्पद स्फोट झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी सफेद पावडर आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, लोकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List