शेरनी संसद आ गयी! प्रियांका गांधींच्या शपथविधीवर संजय राऊत यांची प्रतिक्रीया

शेरनी संसद आ गयी! प्रियांका गांधींच्या शपथविधीवर संजय राऊत यांची प्रतिक्रीया

काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी यांनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. प्रियांका गांधी यांनी देखील राहुल गांधी यांच्या प्रमाणेच हातात संविधानाचाी प्रत घेऊन शपथ घेतली. प्रियांका गांधी यांच्या शपथविधीनंतर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘शेरनी संसद आ गयी!’ अशा शब्दात आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणूकीत तब्बल चार लाख मतांची आघाडी घेत काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांनी विजय मिळवला. या विजयानंतर प्रियांका गांधी यांनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली.

प्रियंका गांधी यांनी शपथ घेतली त्यावेळी त्यांचे बंधु लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी, आई काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मुलगा रेहान वाड्रा आणि मुलगी मिराया वाड्रा उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;